Parent Testimonials
Voices of trust and transformation — Parents share their heartfelt experiences at Parambi.
Parambi Learning Centre is a very unique school. It has an excellent environment to study and is deeply rooted in Indian culture. The school moves ahead with the motto of experiential learning. As a parent, I have seen a lot of development in my child. My decision to start my child’s learning at Parambi was very justified. I truly appreciate all the efforts taken by the school.
— Sagar Gore (Parent of Tanish, Grade 1)
ह्या शाळेत आल्यानंतर इथल्या शिकवण्याच्या पद्धती मला वेगळ्या वाटल्या, लहान मुलांसाठी शाळेत मॉन्टेसरी लॅब विकसित केली आहे. अनुभवातून शिक्षण हा शाळेचा संदेश होता तो मला आवडला. सकाळी शाळेत परिपाठ होतो त्यात दिवसभरात आपण कोणत्या वेळी कोणते श्लोक स्तोत्र म्हणायचे हे मुलांना शिकवले जाते. आपले सर्व सणवार जे येतात ते त्या पद्धतीत साजरे केले जातात उदाहरणार्थ :आषाढी एकादशी साजरी झाली तेव्हा वारकरी मंडळी बोलवून भजनाचा कार्यक्रम येथे करण्यात आला त्यावेळी वातावरण खूप प्रसन्न होते. माझ्या मुलींच्या ज्या फिल्ड व्हिजिट झाल्या त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बँकिंग व्यवहार समजून घेण्यासाठी एक होती, व्हिजिट वरून आल्यावर तिने तो अनुभव मला सांगितला. ती आजही बँकेसमोरून जाता येता मला सांगते पापा मै इस बँक मे गई थी और मैने पैसे डिपॉझिट किये थे …! येथे मुलांना एअरपोर्टला नेऊन त्यांना गोष्टी कशा फंक्शन होतात ते दाखवले जाते, या सर्व गोष्टी मला चांगल्या वाटल्या. लहान मुलांना ह्या गोष्टी अनुभवातून शिकल्यानंतर चांगल्या आणि कायम लक्षात राहतात. मुलांना खेळण्यासाठी भरपूर वेळ शिक्षक उद्देश पूर्वक उपलब्ध करून देतात
— सारंग शर्मा (Parent of Vaishvi & Nirvi, Grade 1 & LKG)
माझी मुलगी खूप एकटी राहत होती, पण पारंबीमधे आल्यापासून तिच्यात खूप बदल झाले. ती आता सर्व मुलांमध्ये मिसळते, शिक्षकांशी मैत्रीचं नातं बनवत आहे. Academics मध्येही छान प्रगती झाली आहे.
— शारदा शिंदे (Parent of Snehashree, LKG)
“I am the parent of Rachit Gurave. He was in Nursery and is now promoted to LKG. We are very satisfied with the efforts teachers are taking at Parambi Kids Learning Centre. Whatever he is doing — creativity, innovations, and the classroom methods — is really commendable. I highly recommend Parambi Kids Learning Centre to every parent who wants holistic development for their child.”
— नेहा गुरावे (Parent of Rachit Gurave, LKG)
मुलांना शैक्षणिक भेटीमध्ये एअरपोर्ट, व्हेजिटेबल मार्केट, बाजारपेठेत नेल्यामुळे मुलांना वास्तव जगातील गोष्टी शिकायला मिळतात आणि शिकणे आनंददायी होते.
— तुषार वाबळे (Parent of Dhairyashil, Nursery)
गिरीजाची प्रगती खूप छान आहे. वर्गामध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटींचा समावेश खूप असतो, त्यामुळे संस्कृती मुलांमध्ये जोपासायला मदत होते.
— अर्चना बोऱ्हाडे (Parent of Girija, LKG)
माझा मुलगा लाजाळू होता, पण पारंबी मध्ये आल्यापासून खुलला आहे. शिक्षक वैयक्तिक लक्ष देऊन मुलांमध्ये प्रगती साधून घेतात.
— प्रसाद धनवटे (Parent of Sairaj, LKG)
जेव्हा तो पारंबीमधे आला तेव्हा चार-पाच शब्दच बोलत होता. इथे आल्यानंतर त्याला कसं बोलायचं हे कळलं. आता तो वाक्य खूप छान बोलतो आणि शैक्षणिक प्रगती उत्तम आहे. आता Ascending, Descending Numbers क्रमाने लावतो तसेच CVC words वाचतो. सुरुवातीला शाळेत सांगितलं होतं की नर्सरी मध्ये CVC words मुलं वाचतात पण माझा थोडा विश्वास कमी होता. पण आता तो two letter आणि three letter words सहज वाचतो.
— ज्योती शिंदे (Parent of Rajveer, Nursery)
पारंबी ही खुपच छान आहे. नर्सरी ला माझ्या मुलीला मी दुसऱ्या शाळेत टाकले होते पण पारंबी मध्ये एलकेजी वर्गात टाकल्यापासून तिच्यात बरीच प्रगती आहे. शाळेतील शिक्षक खूप छान आहेत, सर्व काही व्यवस्थीत करून घेतात.
— निकिता करमासे (Parent of Mithita, LKG)
👆 Swipe or use arrows to read more